संगमनेर महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात संपन्न प्रतिनिधी — संगमनेर महाविद्यालयात ‘हिंदी दिन’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी संगमनेर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा.श्रीहरी पिंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सदरकार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड हे अध्यक्ष स्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुनिल चव्हाण यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय व स्वागत डॉ.सचिन कदम यांनी केले. हिंदी दिना विषयी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. श्रीहरी पिंगळे म्हणाले की, हिंदी भाषा ही देशाला एकात्मतेच्या धाग्याने बांधणारी समृद्ध भाषा आहे. हिंदी भाषा ही केवळ भाषा नसून…