‘अमृतसागर’ यावर्षी दुधाला प्रतिलिटर दोन रुपये रिबेट देणार — वैभव पिचड
प्रतिनिधी —
महाविकास आघाडी सरकारने जादा रिबेट दिले म्हणून संघाला नोटीसा दिल्या असल्या तरी आपण या वर्षी प्रती लिटर दोन रुपये रिबेट देणार असल्याची माहिती अमृतसागर सहकारी दुध व्यवसायिक प्रक्रिया दुध संघाचे चेअरमन माजी आमदार वैभव पिचड यांनी म्हटले आहे.

अमृतसागर दुध संघाची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा बँकेच्या सहकार सभागृहात पार पडली. या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर संघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकचौरे, संचालक भाऊपाटील नवले, गोरख मालुंजकर, विठ्ठल डुंबरे, विठ्ठल चासकर, शरद चौधरी, सोपान मंडे, रामदास आंबरे, सुभाष बेनके, प्रवीण धुमाळ, रविंद्र हांडे, नंदा कचरे, रेखा नवले, कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत उपस्थीत होते.

पिचड म्हणाले की, गेली दोन वर्षे संघाची वार्षिक सभा ऑनलाइन झाली. त्यामूळे आपला प्रत्यक्ष संपर्क झाला नाही. शेतकरी करोनामुळे अडचणीत होता. मात्र दुधाचे दर आपण कमी न करता जादा भाव शेतकऱ्यांना दिला. लंपीचे मोठे संकट आले असून याही काळात संघाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता सर्व प्रथम मदत करण्याचे धोरण घेतले आणि आज पर्यंत चार हजार लसीकरण केले. या पुढे होणारे लसीकरण मोफ़त देणार असल्याची ही घोषना पिचड यानी केली.

अहवाल वर्षात संघाला जास्तीत जास्त दुध पुरवठा करणारे संस्थाना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण दुध संस्था ब्राम्हणवाडा, द्वितीय क्रमांक योगिता, कनेरओहळ, तृतीय क्रमांक प्रवरा, सुगाव, उत्तेजनार्थ जनलक्ष्मी वाघापूर, शेषनारायण, कुंभेफळ तसेच आदिवासी भागातील संस्था म्हणून प्रथम क्रमांक अमृतवाहिनी मूढेवाडी, मुक्तदेवी पैठण, सातेवाडी दुध सातेवाडी, वेताळपंथी चिंचावने, गुरुदत्त घोटी यांचा समावेश असून व्यक्तिगत दुध पुरवठा करणारे शेतकरी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

यामध्ये प्रथम सुदाम काकड, द्वितीय प्रवीण धुमाळ, तृतीय नामदेव साबळे, चतुर्थ रेवचंद भोर, उत्तेजनार्थ माधव काळे तर आदिवासी भागात प्रथम पाराजी वायाळ, द्वितीय ज्ञानेश्वर घिगे, तृतीय योगेश मुंढे, उत्तेजनार्थ विजय घिगे, सोमनाथ घिगे याचा समावेश आहे.

सभेच्या अध्यक्ष पदाची सुचना संचालक भाऊपाटील नवले यानी मांडली त्यास संचालक गोरक्ष मालुंजकर यानी अनुमोदन दिले. तर श्रध्दांजली ठराव संचालक शरद चौधरी यानी मांडला. प्रारंभी मागील वार्षिंक सभेचे इतिवृत्त वाचन कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यानी केले. आभार संचालक रामदास आंबरे यानी मानले.

