बँका व पतसंस्थांमधून 9500 कोटींच्या ठेवी हे तालुक्याच्या समृद्धीचे प्रतीक — बाळासाहेब थोरात

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार चळवळीसाठी दिलेल्या आदर्श तत्वांचे पालन संगमनेर मधील सहकार संस्थांमध्ये केले जात आहे यामुळे सर्व सहकारी संस्था ह्यात आदर्शवत आहेत. सहकार चळवळ ही जनतेच्या विकासाचे साधन असून ती जपली पाहिजे असे सांगताना तालुक्यातील बँका व पतसंस्था मिळून 9500 कोटींच्या ठेवी हे तालुक्याच्या समृद्धीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन माजी महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

अमृतवाहिनी सहकारी बँकेत संगमनेर तालुका पतसंस्था फेडरेशन च्या वतीने संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले यावेळी ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी मा. आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब टाक, ॲ.ड नानासाहेब शिंदे, गणपतराव सांगळे,संचालक अण्णासाहेब शिंदे ,किसन वाळके, शिवाजी जगताप, विवेक तांबे, ॲड. लक्ष्मण खेमनर मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती, योगेश उपासनी, बापूसाहेब गिरी, राणी प्रसाद मुदडा आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, सहकार चळवळ ही सर्वसामान्यांच्या विकासाचे साधन आहे. सहकार चळवळ आपण जपली पाहिजे टिकवली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. बँकिंग हा व्यवसाय अत्यंत अडचणीचा असून 90 च्या दशकामध्ये पतसंस्था चळवळीला राज्यामध्ये सुरुवात झाली. आज संगमनेर तालुक्यात पतसंस्थांचे मोठे जाळे असून तालुक्यातील बँका व पतसंस्था मिळून सुमारे 9500 कोटींच्या ठेवी आहेत. बँकांना अडीच महत्त्वाचे असून अत्यंत काटेकोरपणे सर्वांनी कामकाज करावे नवीन नियमांची पालन करावे. चांगली ग्रामीण अर्थव्यवस्था सहकारी संस्था यामुळे शहरातील बाजारपेठ फुलली आहे. व्यापार वाढला आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बँकांसह विविध पतसंस्था संगमनेर मध्ये आहे. ही समृद्धी आपल्याला जपायची असून सहकारातून निर्माण झालेली ही परंपरा टिकवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले.

तर माजी आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये चालू असल्यास सर्व पतसंस्था अत्यंत उत्कृष्टपणे काम करत असून या प्रशिक्षणामधून अनेकांना नवीन योजनांची माहिती मिळणार आहे.

यावेळी संगमनेर मधील विविध पतसंस्थांचे चेअरमन , व्हा.चेअरमन संचालक मॅनेजर आदींसह बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!