नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गे गेली तर शिवनेरीच्या पावन भूमीचाही स्पर्श होईल ! 

नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गे करावी यासाठी आमदार सत्यजित तांबे यांची विधान परिषदेत आग्रही मागणी

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी प्रेरणादायी आहे महाराजांचा जन्म हा किल्ले शिवनेरी येथे झाला असून नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गे गेल्यास पुढे जुन्नर तालुक्यातून जाते यामुळे शिवनेरी येथील ऐतिहासिक महत्त्व वाढणार असून हा मार्ग संगमनेर मार्गी करावा अशी आग्रही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.

आमदार तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे. महाराजांचा जन्म हा जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे झाला आहे. नाशिक – पुणे रेल्वे सिन्नर, संगमनेर,bजुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड मार्गे पुण्याला जाणार आहे. यामुळे महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला त्याचबरोबर धार्मिक स्थळे ओझर लेण्याद्री सुद्धा जोडले जाणार आहे.

महाराजांचा इतिहास पाहण्याची रेल्वेमुळे राज्यभरातील नागरिकांना सुविधा होणारा असून याकरता नाशिक – पुणे संगमनेर मार्गे होणारा रेल्वे मार्ग हा अधिक सोयीचा आहे आणि म्हणून हा मार्ग संगमनेर वरूनच जावा अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.

संगमनेर मध्ये मोठे जन आंदोलन

माजी बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून नाशिक – पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे नियोजित झाली होती. मात्र सत्ता बदली आणि रेल्वेचा पुणे पुलतांबा असा उलटा मार्ग झाला. संगमनेर मार्ग हा नैसर्गिक असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा अधिग्रहित झाल्या आहे. या रेल्वे मार्गामुळे व्यापार,शिक्षक आणि उद्योग व्यवसायात वाढ होणार असल्याने नव्याने प्रस्तावित झालेल्या नाशिक, शिर्डी,vअहिल्यानगर, पुणे मार्ग रद्द करून संगमनेर मार्गेच रेल्वे व्हावी या मागणी करता सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, अकोले, खेड, मंचर मधील सर्व नागरिक आक्रमक झाले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे रेल्वे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!