चांगल्या कामात अडथळा आणणाऱ्यांना मालुंजे ग्रामस्थांनी धडा शिकवला – नवनाथ अरगडे

थोरात कारखान्याच्या मदतीने मालुंजे बंधाऱ्यात आलेल्या पाण्याचे पूजन

 

प्रतिनिधी — 

 

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यात सर्वत्र सिमेंट बंधाऱ्यांचे जाळे निर्माण करून ठिकठिकाणी पाणी साठवणूक केली आहे. अंभोरे धरण हे या परिसरात वरदान ठरणारे असून या धरणातील ओव्हर फ्लो चे पाणी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने मालूंजे येथील बंधाऱ्यात सोडण्यात आले असून या आलेल्या पाण्याचे पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

मालुंजे  येथे झालेल्या जलपूजनाच्या वेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, चेअरमन बाबा ओहोळ, उपसभापती नवनाथ अरगडे, संतोष हासे, सुभाष सांगळे, संतोष नागरे, निवृत्ती घुगे, संजय खरात, गणेश डोंगरे, तात्याबा डोंगरे, संपत जोशी, आदींसह डिग्रस, शेडगाव, हंगेवाडी व मालुंजे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

मालुंजे, डिग्रस, अंभोरे हा परिसर दुष्काळग्रस्त असून या भागात आमदार बाळासाहेब थोरात यांनी ठिकठिकाणी निर्माण केलेल्या बंधाऱ्यांमुळे चांगला जलसाठा निर्माण होत आहे. आमदार थोरात यांनी सरकारच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम केले आहे. याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी गरज असेल त्या त्या वेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जलसंधारणासाठी मोठी मदत झाली आहे. कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना तालुक्यात जल समृद्धी वाढवली आहे.

यावर्षी इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या डेव्हलपमेंट विभागाने अंभोरे धरणातून ओव्हर फ्लो चे पाणी हे मालुंजे गावात सोडले. यामुळे या परिसरात शेतकरी बांधवांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. काही विरोधक शक्तींनी या पाण्याच्या पुजनाला विरोध करण्याच्या प्रयत्न केला, मात्र सर्व गाव एकत्र आल्याने या पाण्याचे पूजन मोठ्या उत्साहात झाले.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम विकासाची रचनात्मक काम केले आहेत. सर्वांना बरोबर घेऊन तालुक्याचा लौकिक वाढवला आहे. मात्र तालुक्यातील काही घरभेदी हे बाह्य शक्तींना बळी पडत असून तालुक्याच्या विकासात खोडा घालत आहेत. मालुंजे ओव्हर फ्लो पाण्याबाबत या नतद्रष्ट मंडळींनी उद्योग केला. मात्र सर्व जनता एकवटली असून अशा अडथळा आणणाऱ्या व्यक्तींना गावातील नागरिकांनी चांगला धडा शिकवला आहे. हे अत्यंत आनंदाचे आहे. तालुक्याच्या विकासात खोडा घालणाऱ्या व सर्वसामान्य जीवनाशी खेळणारे या प्रवृत्तीच्या विरोधात तालुक्यात मोठा प्रक्षोभ होत असून त्यांनी यापुढे तरी आता संगमनेर तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपावी 

नवनाथ अरगडे, माजी उपसभापती पंचायत समिती संगमनेर

यावेळी गावातील नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या जिंदाबाद च्या घोषणा दिल्या.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!