स्थानिक गुन्हे शाखेचा घारगांव परिसरामध्ये अवैध दारु धंद्यांवर छापा !
3 लाख 16 हजार 445 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली असून या कारवाईत 3 लाख 16 हजार 445 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.

अकलापूर गावच्या शिवारात येलखोप वाडी येथे जय मल्हार हॉटेलमध्ये देशी विदेशी दारूची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती एलसीबीच्या पथकास मिळाली या ठिकाणी छापा टाकून पथकाने कारवाई केली आहे

शशांक नंदु निमसे (वय – 22 वर्षे रा. संतवाडी, निमसेमळा, आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी आणि तेथे उभी असलेल्या कारची झडती घेता सदर ठिकाणी 16,445/- रु किमतीच्या विविध कंपनीच्या विदेशी दारुच्या बाटल्या तसेच 3,00,000/- रुपये किमतीची टोयोटा कंपनीची कार असा एकुण 3,16,445/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपींविरुध्द पोकॉ/176 बाळासाहेब अशोक गुंजाळ यांच्या फिर्यादीवरुन घारगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 383/2025 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, भगवान थोरात, चालक भगवान धुळे या पथकाने केली आहे.
