पानोडी (संगमनेर) येथे वाळू माफियावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

आश्वी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या तस्करांची माहिती काढत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पानोडी गावच्या शिवारातील कॅनॉलवर एक टाटा कंपनीची पिक-अप गाडी दिसुन आली. सदर गाडी ऋषिकेश कारभारी वर्षे (वय २८ वर्षे, रा. कनोली, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याची असल्याचे उघड झाले.

सदर टेम्पोच्या मागील हौदामध्ये वाळू भरलेली आढळून आली. चालकाकडे कोणताही वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे समोर आले. तसेच चालकाकडे सदर वाळू व वाहनाबाबत अधिक विचारपूस करता त्याने सदरचे वाहन हे त्याचे असुन वाळू ही जोर्वे गावातील प्रवरा नदीच्या पात्रातुन भरुन आणलेली असल्याचे उघड झाले.

सदर व्यक्तीच्या कब्जातून १०,०००/- रुपये किमतीची १ ब्रास वाळू व ३,००,०००/- रुपये किमतीची टाटा कंपनीची पिक-अप (झेनॉन) टेम्पो, असा एकुण ३,१०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोकॉ/१७६ बाळासाहेब अशोक गुंजाळ नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरुन आश्वी पोलीस ठाणे गु.र.नं. २९८ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास आश्वी पोलीस स्टेशन करीत आहेत.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार संतोष खैरे, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, चालक भगवान धुले या पथकाने केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!