कॅफे मध्ये अश्लील कृती करताना तरुण -तरुणी आढळून आले 

 संगमनेरात दोघांवर गुन्हा दाखल

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहरात अकोले नाका परिसरातील शारदा शाळेसमोर असणाऱ्या कासट व्यापारी संकुलातील बेसमेंट मधील एका गाळ्यात अवैधरित्या कॅफे चालवून त्या ठिकाणी तरुण-तरुणींना वेगवेगळे कंपार्टमेंट करून अश्लील कृती करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रकार समोर आला असून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी शहरातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश सुरेश वालझाडे (वय 48 राहणार स्वातंत्र्य चौक, संगमनेर) आणि सोपान एकनाथ पवार (वय 24 वर्षे राहणार काठे मळा, संगमनेर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉलेजमधील प्रेमी युगुलाना आणि तरुण-तरुणींना निवांत जागा मिळावी यासाठी संगमनेरात काही कॅफे बेकायदेशीर रित्या सुरू असल्याचे मागे सुद्धा आढळून आले आहे. पोलिसांनी बऱ्याच वेळा अशा कॅफेंवर छापा टाकून कारवाई केलेली आहे. दरम्यान संगमनेर शहरातील गजबजलेल्या अकोले नाका परिसरातील कासट व्यापारी संकुलामध्ये बेसमेंट मध्ये असणाऱ्या एका गाळ्यात अवैध कॅफे सुरू करून त्या ठिकाणी कंपार्टमेंट करून तरुण मुला-मुलींना खाजगी स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आली. या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांनी अचानक छापा टाकला असता पोलिसांना तेथे काही तरुण मुले मुली अश्लील कृती करताना आढळून आले.

पोलिसांनी या संदर्भातील मूळ गाळा चालक आणि सदर गाळा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी अवैध कॅफे चालवणाऱ्या अशा दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे. शहरातील उपनगरात आणि अशा काही ठिकाणी कॅफे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी अशीच कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पोलीस कॉन्स्टेबल विजय ताबाजी आगलावे यांनी फिर्याद दिली असून सदर कारवाई पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, कॉन्स्टेबल राहुल पांडे आणि विजय आगलावे यांनी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!