शेतकऱ्यांच्या नावावर ट्रॅक्टर घेऊन परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

टोळीतील दोघांना अटक ; 71 लाख रुपये किमतीचे नऊ ट्रॅक्टर जप्त 

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

शेतकऱ्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांच्याकडून कागदपत्रे घेत बँकेमार्फत ट्रॅक्टर घेऊन ते परस्पर दुसऱ्यांना विकणाऱ्या टोळीचा अकोले तालुक्यातील राजुर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या टोळीतील दोघा जणांना अटक केली आहे. परस्पर विकलेले 9 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून दोन मोटरसायकल देखील मुद्देमालात ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या संदर्भात अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

भालचंद्र अशोक साळवी (राहणार वनकुटे, तालुका पारनेर) आणि अभिजीत सुनील भांडवलकर (राहणार सिव्हिल हडको, अहिल्यानगर) या दोघांना अटक करण्यात आलेली आहे.

या दोघांनी विविध शेतकऱ्यांना फसवून बँकेमार्फत ट्रॅक्टर घेऊन देतो असे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घेऊन परस्पर ट्रॅक्टर घेऊन ते ट्रॅक्टर विविध गावांमध्ये विकले अशा नऊ ट्रॅक्टरचा व्यवहार उघडकीस आला असून हे सर्व ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आहेत.

यासंदर्भात राजुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या टोळीतील दोघांना पकडले आणि सर्व प्रकार उघडकीस आणला. पुढील तपास राजुर पोलीस स्टेशन करीत आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!