चंदन तस्करी पकडली !  एकाला अटक, एक जण पसार

 पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ; एलसीबीची कारवाई

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

चंदनाची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्या दोघाजणांना सापळा रचून पकडले मात्र एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने एलसीबीने ही कारवाई केली आरोपींकडून चंदनासह इतर पाच लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, प्रमोद जाधव, सतिष भवर, सुनिल मालणकर, चालक महादेव भांड आदींनी ही कारवाई पार पाडली आहे.

दिनांक 18/12/2025 रोजी पथक लोणी पोलीस ठाणे हद्दीत अवैध चंदनाची वाहतुक व विक्री करणाऱ्या इसमाबाबत माहिती काढत असताना. पोलीस निरीक्षक कबाडी यांना एक इसम पांढऱ्या रंगाच्या स्विप्ट कारमधुन नाशिक येथून चंदनाची लाकडे विक्री करण्याचे उद्देशाने नांदुर शिंगोटे मार्गे श्रीरामपुरकडे येत आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाली.

कबाडी यांनी सदरची बातमी पथकास सांगुन कारवाई करणे बाबत कळविले. पथकाने तळेगाव ते लोणी रोडवर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटरच्या पुढे सापळा लावून थांबले असतांना तळेगाव कडून लोणी रोडने एक पांढऱ्या रंगाची स्विप्ट कार येतांना दिसून आली. तेव्हा पथकाने सदर वाहनास इशारा करुन थांबवून कारची झडती घेतली. कार मधून 60,000/-रु कि.चे 30 किलो. चंदनाची लाकडे, 5,00,000/-रु कि.ची एक मारुती सुझुकी कंपनीची स्विप्ट कार, 10,000/- रु.कि.ची एक मोबाईल असा एकुण 5,70,000/-रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

1) हनुमंता भिमा मोरे, वय – 45 वर्षे (रा. उंबरगांव ता, श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर) असे कार मधील आरोपीचे नाव आहे. सदर चंदनाची लाकडे 2) उत्तम नारायण पवार (रा. पळसे साखर कारखाना शेजारी, ता.सिन्नर जि.नाशिक (फरार) याच्याकडून विक्री करण्यासाठी आणली असल्याचे उत्पन्न झाले.

वरील आरोपीविरूध्द लोणी पोलीस स्टेशन गुरनं 659/2025 बीएनएस 2023 चे कलम 303(2), 3(5) , भारतीय वन कायदा 1927 चे कलम 42 सह महाराष्ट्र वन अधीनियम कलम 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा पुढील तपास लोणी, पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!