लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यात अद्यावत नऊ अभ्यासिका – डॉ.जयश्री थोरात
राजापूर येथे अभ्यासिकेचे भूमिपूजन
संगमनेर प्रतिनिधी —
लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून वाचन चळवळ समृद्ध होण्याबरोबरच तरुणांना अभ्यासासाठी 9 अद्यावत अभ्यासिका होणार असून ही राज्यातील आदर्शवत संकल्पना असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून राजापूर येथे ग्रामविकास 2515 अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 30 लाख रुपये निधीतून होणाऱ्या अद्यावत अभ्यासिकेच्या भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी समवेत संतोष हासे, माधव हासे, मनीषा हासे, लतिका गायकर, कुसुमताई पानसरे, बाबासाहेब गायकर, सोमनाथ हासे, संजय हासे,प्रदीप हासे, अजय हासे, रावसाहेब खतोडे, राजेंद्र खैरनार, विनीत खतोडे,रमेश जाधव, शैला हासे, राजश्री घोलप, जयश्री हासे, देवराम हासे, आनंदा हासे , प्रशांत तिकांडे, बाळासाहेब बर्डे, भास्कर मोहिते, अविनाश शेलकर, भारत हासे, सुशांत हासे, राहुल गायकर, संभाजी हासे, विकास हासे, अमोल साळुंके, आदी उपस्थित होते.

डॉ. थोरात म्हणाल्या की, संगमनेर हे अद्यावत शिक्षणाचे केंद्र झाले आहे. तालुक्यामध्ये विविध भागांमध्ये अद्यावत अभ्यासिका उभारून विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी महत्त्वाच्या सुविधा करण्याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 9 अभ्यासिकांची संकल्पना राबवली आहे. तालुक्यातील नऊ गावांमध्ये या अभ्यासिकांचे काम सुरू करण्यात येणार आहे. राजापूर येथून संगमनेर येथे येणारे अनेक विद्यार्थी असून येथे झालेल्या अद्यावत अभ्यासिकेमुळे या सर्व विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. याचबरोबर स्पर्धा परीक्षांसह शैक्षणिक क्षेत्रातील सर्व परीक्षांकरिता युवक व युवतींना या अभ्यासिकेची मोठी मदत होणार आहे. संगमनेर तालुक्यात राबवले जाणारे हे पहिलेच मॉडेल असून यामुळे युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी संतोष हासे,बाबासाहेब गायकर यांनीही आपली मनोगती व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप हासे यांनी केले तर रावसाहेब खतोडे यांनी आभार मानले. यावेळी राजापूर सह परिसरातील नागरिक महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
