अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा अन्यथा कायदेशीर कारवाई — तहसीलदार

संगमनेर दि. (सा.वा.)

 

राज्य सरकारने गरजू आणि योग्य लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी अपात्र रेशन कार्ड धारक आणि उच्च गटातील लाभार्थ्यांना अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेतून मुदतीत बाहेर न पडल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रक संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गरजू व योग्य लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी “राज्य सरकारने अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा” ही योजना सुरु केली आहे. अपात्र रेशनकार्डधारक , उच्च गटातील लाभार्थ्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडणे. मुदतीत बाहेर न पडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तसेच शहरी भागातील वार्षिक उत्त्पन्न ५९०००/- रुपये व ग्रामीण भागातील वार्षिक उत्त्पन्न ४४०००/- रुपये उत्पन्नाची अट ठेवण्यात आलेली आहे. यापेक्षा जास्त उत्त्पन्न असणाऱ्या सधन रेशनकार्ड धारकांनी सवलतीच्या दराचा अन्नधान्याचा लाभ सोडवा. तसेच रेशनकार्ड धारक लाभार्थी अन्नधान्यातून बाहेर न पडल्यास प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावाप्रमाणे वसुली करण्यात येईल.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा २०१३ योजनेअंतर्गत अपात्र शिधापत्रिका धारकांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी झाल्यास जे गोरगरीब व गरजू घटक विधवा, परितक्त्या, अपंग, भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, दुर्घर आजारग्रस्त, कुष्टरोगी अन्नधान्याच्या योजनेपासून वंचित आहेत. त्या खऱ्या लाभार्थ्यास अन्नधान्याचा लाभ देणे सुलभ होईल.

शासनाने गरजू व्यक्तींना कमी दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले असून आजही बरेच लाभार्थी अन्नधान्याच्या योजेनापासून दूर आहेत. गाव व शहर निहाय ठरवून दिलेला इष्टांक पूर्ण झाले असल्याकारणाने अन्नधान्यासाठी पात्र असणाऱ्या गरजू घटकास लाभ देणे शक्य होत नाही.

अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे कालांतराने उत्पन्न वाढेलेले असेल त्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडावे, आपण असे केल्यास अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याकरिता शासनावर येणारा आर्थिक भार कमी होणार आहे.

त्यामुळे कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील सदस्य शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, पेंशनर, बागायती शेती, प्राप्तीकर / आयकर / इन्कम टॅक्स भरणारे, व्यापारी, उद्योजक, ट्रक्टर, चारचाकी आदी वाहन असलेले, तसेच आपले उत्पन्न वाढलेले असेल, आपण सधन असाल आपण स्वतःहून सवलतीच्या दराचा अन्नधान्याचा लाभ सोडावा. अन्यथा अन्नसुरक्षा योजेनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल.

तसेच आपले आधारकार्ड सर्व ठिकाणी आधारलिंक करण्यात आलेले आहे त्यामुळे कुणीही आपले उत्पन्न लपवण्याचा प्रयत्न करू नये, सदन रेशनकार्ड धारकांनी स्वेच्छेने आपला सवलतीच्या दराचा अन्नधान्य लाभ सोडावा.

तसेच आज पर्यंत संगमनेर तालुक्यातील २१४ रेशनकार्डधारक व त्यावरील ९४९ लाभार्थ्यांनी “अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा” (Opt Out of Subsidy of food grains) या योजनेत सहभागी झालेले आहेत. तसेच उर्वरित सधन रेशनकार्डधारकांनी सवलतीच्या धान्याचा लाभ सोडावा.

ज्यांना अन्नधान्य योजनेतून बाहेर पडायचे आहे त्यांनी तसा अर्ज संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडे अथवा पुरवठा विभाग, तहसील कार्यालय येथे जमा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!