प्रसिद्ध रंधा धबधबा येथील घोरपडा देवी मंदिरात चोरी करणारे जेरबंद !
राजुर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांना पकडले
प्रतिनिधी–
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भंडारदरा येथील रंधा धबधब्या जवळील घोरपडा देवीच्या मंदिरातील दानपेटी व रक्कम पळविणारे चोरटे राजुर पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहेत.

विजय विठ्ठल येडे (रा.रंधा, ता.अकोले) जि.अहमदनगर यांनी फिर्याद दिली होती. घोरपडा देवी मंदीराच्या प्रवेशद्वाराला असलेले कुलुप तोडुन देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली दानपेटी व दानपेटीतील रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. त्याबाबत राजुर पोलीस स्टेशनला गु.र.नं.I 194/2022 भा.द.वी.कलम 380,454,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करून 1) युवराज मुरलीधर येडे, वय- 39 वर्षे, रा. रणद खुर्द, ता. अकोले, 2) विशाल बारकु चव्हाण, वय-20 वर्षे, सध्या रा. रणद खुर्द, ता. अकोले, मुळ रा. टाकेद बु॥, ता. इगतपुरी, जि. नाशिक, 3) विधीसंघर्शीत बालक, यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता सदर आरोपी यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.

सदर आरोपींकडुन चोरी गेलेली दानपेटी व रक्कम हस्तगत केली आहे. सदर गुन्ह्यात आरोपी यांस अटक केली असुन पुढील तपास पोलीस नाईक दिलीप डगळे करत आहेत.
राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व अंमलदार- पोना/फुरकान शेख, नेम.अपर पोलीस अधिक्षक कार्यालय, श्रीरामपुर, पोना/डगळे, पोकाँ/ अशोक गाढे, पोकाँ/अशोक काळे, चापोना/ पांडुरंग पटेकर या सर्वांनी या तपासात सहभाग घेतला आहे.

