चोरीच्या महागड्या गाड्या जप्त ; तीन सराईतांना ठोकल्या बेड्याचोरीच्या महागड्या गाड्या जप्त ; तीन सराईतांना ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी —

तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच शहरातील विविध ठिकाणावरून महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना तोफखाना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून ६ लाख १५ हजारांच्या सात मोटरसायकली जप्त केल्या आहेत.

करण मनोज पवार (रा.कॉटेज कॉर्नर, नगर), उमेश दिलीप गायकवाड (रा.नाना चौक, ढवणवस्ती), मनोज गोरख मांजरे (रा.कल्याण रोड, नगर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांचे कडे तपास केला असता त्यांनी अहमदनगर शहरातुन विविध ठिकाणाहुन या गाड्या चोरलेल्या आहेत अशी कबुली दिली. हि कारवाई जिल्हा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखालील तोफखाना पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन

रणशेवरे, हवालदार दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, पोलिस नाईक दिनेश मोरे, संदिप धामणे, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, सुरज वाबळे, भानुदास खेडकर, सचिन जगताप, सतिष त्रिभुवन, सतीष भवर, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सुमीत गवळी, गौतम सातपुते तसेच तांत्रीक विश्लेषण राहुल गुंडू यांनी केला असुन पुढील तपास पोलीस नाईक संदिप धामणे करीत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!