मोटार चोरी करणाऱ्या दोघांना राजूर पोलीसांनी केले जेरबंद

९४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी —

राजूर पोलिस ठाणे हद्दीतील (ता.अकोले) कुमशेत गावातून पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरी करण्यात आल्या होत्या. या संदर्भात गुन्हे दाखल होता. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर या मोटारीत चोरणारे दोघेजण पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.

राजुर पोलीस स्टेशन हद्दीतील कुमशेत गावाच्या शिवारातुन दोन इलेट्रिक पाण्याच्या मोटारी, स्टाटर, वायर चोरी झाल्या बाबत तक्रारी वरुन अज्ञात आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याचा तपास राजुर पोलीस करित असताना 1) संतोष पांडु कोकतरे (वय- 23 वर्षे, रा. जाणेवाडी, ता. अकोले) 2) गोपिनाथ दुंदा पोरे (वय- 22 वर्षे, रा. शिसवद, ता. अकोले) यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्यानुसार खालील प्रमाणे साहित्य त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आले आहे.

1) 12,000/- रु. किमतीची लक्ष्मी कंपनीची 3HP इलेट्रिक पाण्याची मोटार

2) 9,000/-रु. किमतीची लुबी कंपनीची 2HP इलेट्रिक पाण्याची मोटार

3) 3,000/-रु. किमतीचे मोटार चालु करण्यासाठी लागणारे इलेट्रिक स्टाटर

4) 70,000/-रु. किमती टिस्टर मोडल असलेली होंडा कंपनीची निळ्या रंगाची मोटार सायकल नंबर एम.एच. 02 सी.सी. 8207 जु.वा. कि.अं. एकुण 94,000/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, हवालदार विजय मुंढे, कैलास नेहे, पोलीस नाईक दिलीप डगळे, पोलीस शिपाई पवार, संभाजी सांगळे, विजय फटांगरे,अशोक गाढे, अशोक काळे,पटेकर यांनी केली आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!