अहिल्यानगर जिल्ह्यात जुगार आणि दारू अड्ड्यांवर एलसीबी चे छापे !
अकोलेत 6 ठिकाणी छापे ; 21 गुन्हे दाखल
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क :
स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हाभर राबविलेल्या विशेष मोहिमेत अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत २१ गुन्हे दाखल केले असून १ लाख ३२ हजार ६७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी तोफखाना, भिंगार कॅम्प, अकोले व शेवगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे २८ जुलै २०२६ रोजी कारवाई केली.
या मोहिमेत १० ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांवर तर ११ ठिकाणी अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण २१ गुन्हे दाखल करण्यात आले.
कारवाईचा तपशील :
अवैध दारू विक्री
– भिंगार कॅम्प – १ गुन्हा, ₹७,१२० मुद्देमाल
– अकोले – ४ गुन्हे, ₹६६,३९५ मुद्देमाल
– शेवगाव – ५ गुन्हे, ₹३४,८५५ मुद्देमाल
एकूण : १० गुन्हे, ₹१,०८,३७० मुद्देमाल
अवैध जुगार अड्डे
– तोफखाना – ४ गुन्हे, ₹६,३१०
– भिंगार कॅम्प – ४ गुन्हे, ₹१०,८९०
– अकोले – २ गुन्हे, ₹५,०००
– शेवगाव – १ गुन्हा, ₹२,१००
एकूण : ११ गुन्हे, ₹२४,३०० मुद्देमाल
स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारू विक्री आणि जुगार व्यवसायाविरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
