वेल्हाळे गावात कृषिदूत म्हणून दाखल !

थोरात कृषी महाविद्यालयाचा उपक्रम..

संगमनेर प्रतिनिधी —

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, संगमनेर येथील विद्यार्थी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत वेल्हाळे गावात कृषिदूत म्हणून दाखल झाले आहेत. गावातील विष्णू आव्हाड (सरपंच), उपसरपंच, ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.

देशमुख यश चंद्रकांत, ढाकणे शिवम वासुदेव, दिघे युवराज भाऊसाहेब, फरगडे यश प्रवीण, गाडे प्रणव कैलास व गोरे आदित्य दिलीप हे या समूहात सहभागी आहेत.

या कार्यक्रमाद्वारे कृषिदूत गावातील शेती पद्धती, पीक उत्पादन तंत्रज्ञान तसेच कृषीपूरक व्यवसायांचा अभ्यास करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेती पद्धती, हवामानानुसार पीक नियोजन, कीड व रोग व्यवस्थापन सोबतच सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडून विविध शेतभेटी, प्रात्यक्षिके व कृषीविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सदर कृषी अभ्यास कार्यानुभव कार्यक्रम माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राबवला जाणार आहे. तसेच यांस संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आणि विश्वस्त शरयू देशमुख यांचे सहकार्य लाभत आहे. उपक्रमास कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रशासकीय अधिकारी जी. बी. बाचकर, शैक्षणिक प्रमुख प्रा. रविन्द्र दसपूते, ग्रामीण जागरूकता कार्यक्रम अधिकारी डॉ. साजन हिंगोणेकर, प्राध्यापक आणि विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!