देवकवठेत जि.प.शाळेच्या चिमुकल्यांची सांस्कृतिक धमाल !

संगमनेर प्रतिनिधी — 

अहिल्यानगर जिल्ह्याच्या टोकावर असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकरता सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या देवकवठे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने “सांज चिमण पाखरांची” या कार्यक्रमामधून देशाच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवले. चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने मोठी धमाल केली असून सर्व नागरिक भारावले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकवठे येथे सांज चिमण पाखरांची हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. राजहंस दूध संघाचे संचालक भारत मुंगसे, एकनाथ मुंगसे, ॲड. बी आर गांडोळे, ऋतुजा गायकवाड, तळेगाव केंद्रप्रमुख विश्वनाथ खिलारी, अमृत उद्योग समूहाचे नामदेव कहांडळ, राजेंद्र कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे, राजेंद्र मुंगसे, शिवराज मुंगसे, कैलास सांगळे, सुनील गुडघे, सरपंच ज्योती मोकळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, भाऊसाहेब कहांडळ, मुख्याध्यापिका अनिता सूर्यवंशी, प्रफुल्ल मुंगसे, राजू खरात, सुरेखा मुंगसे, तुकाराम कहांडळ, बाबासाहेब गाजरे, शत्रुघ्न मुंगसे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

65 विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेमधून 22 सांस्कृतिक विविध कार्यक्रम सादर झाले. यामध्ये संभाजी या नाटिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा घोड्यावरून झालेला प्रवेश, त्यांना झालेली अटक, भव्य दिव्य सेट आणि 45 विद्यार्थ्यांच्या एकत्रित सादर झालेल्या या कार्यक्रमाने सर्वांच्या अंगावर शहारे आणले. अहिराणी नृत्य, कोळी नृत्य, पंजाबी डान्स, यांसह विविध गीतांनी धमाल केली. वेशभूषा सामूहिक नृत्य भव्य स्टेज आणि दिमागदार सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांचा छोटा बच्चा जानके या 17 विद्यार्थ्यांच्या समूहाने सर्वांना खळखळून हसवले. तर प्रत्येक गाण्यांमध्ये नावीन्यता आणि विविधता असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता ही अव्वल दर्जाची असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

यावेळी सुधाकर मुंगसे, ज्ञानदेव कहांडळ, सोमनाथ सांगळे, राजाराम मुंगसे, शरद शेवंते, मच्छिंद्र आरोटे, अशोक गडाख, झुंबरबाई खतोडे, अभिमन्यू मुंगसे, सुनील मुंगसे, मच्छिंद्र सांगळे, ज्ञानेश्वर कुरकुटे, ऋषिकेश मुंगसे, शुभम मुंगसे, अशोक मुंगसे, सुभाष मुंगसे यांच्यासह विविध युवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल मुंगसे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश कहांडळ यांनी केले. तर भाऊसाहेब सांगळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी देवकवठेसह पंचक्रोशीतील नागरिक महिला व युवकांची मोठी उपस्थिती होती.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!