घारगाव मध्ये एलसीबीने गुटखा पकडला !
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा एलसीबीने गुटखा आणि सुगंधी तंबाखू पकडली असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत 55 हजार 600 रुपयांचा गुटखा सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हरिष भोये यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि/दिपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल डोके, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले या पथकाने ही कारवाई केली आहे.
1) प्रभाकर आण्णासाहेब गुळवे (वय 38 वर्षे, रा. रणखांब, ता. संगमनेर) 2) राजु नामदेव ढेरंगे (रा. खंडेरायवाडी, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) 3) आफ्रिदी पठाण (रा. संगमनेर, ता. संगमनेर) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रणखांब गावांच्या शिवारात एका घरामध्ये आरोपी गुळवे यांनी प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू चा साठा करून ठेवला असल्याची माहिती पथकाला मिळाली. छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी वरील स्वरूपाचा माल आढळून आला. राजू ढेरंगे याने हा माल ठेवण्यास सांगितले होते असे गुळवे याने सांगितले तर हा माल अफ्रिदी पठाण, संगमनेर याने पुरवला असल्याचे आरोपींनी सांगितले.
आरोपींच्या ताब्यातून 55,600/- रुपये किमतीचा हिरा पानमसाला गुटखा, रॉयल 717 सुगंधीत तंबाखु, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोकॉ/176 बाळासाहेब अशोक गुंजाळ नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन घारगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 229/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 3(5) सह अन्न सुरक्षा माणके कायदा 2006 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास घारगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
