अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत अशोक इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करावा !

संगमनेर नगरपालिका प्रशासनाचे पोलिसांना पत्र 

विनापरवाना बेकायदेशीरपणे बांधले पाच मजले 

 संगमनेर | प्रतिनिधी –

संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीत सुकेवाडी रोडला अनिकेत अशोक इथापे यांनी नगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता आणि नगरपालिकेने नोटीस बजावूनही बेकायदेशीरपणे जी प्लस फोर असे एकूण पाच मजले इमारत बांधकाम केले असून सध्या हे बांधकाम सुरू आहे या बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचू शकते व इतर नगरपालिका अधिनियम व इतर कलमा नुसार अनिकेत इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा आशयाची दोन पत्रे संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शहर पोलिसांना दिली आहेत. पोलीस यावर कोणती भूमिका घेतात आणि काय कारवाई करतात हे लवकरच समोर येईल.

 पोलिसांना दिलेल्या पत्रकात प्रशासनाने म्हटले आहे की, अनिकेत अशोक इथापे यांनी स.नं. १५३/१/१ येथील ठिकाणी बांधकामास परवानगी घेतलेली नाही व कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम जागेवर करण्यात आलेले आहे. त्याबाबतचा तपशिल खालील नमूद प्रमाणे आहे. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५४ अन्वये विनापरवानगी

बांधकाम स्थगित करण्याबाबत तसेच केलेले बांधकाम त्वरीत काढून घेणेबाबत नोटीस देण्यात आलेली होती. परंतु त्यांनी अद्यापपर्यंत सदरचे सुरु असलेले बांधकाम स्थगित देखील केलेले नाही. तसेच केलेले बांधकाम काढून घेतलेले नाही.

दि.०५/०६/२०२६ रोजी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार पाहणी केली असता पाचव्या मजल्यावर ब्लॉक बसविण्याचे काम सुरु होते. आयुब मणियार यांच्या इमारतीवर व अंगणात अनिकेत अशोक इथापे यांच्या बांधकामाचे ब्लॉक पडलेले दिसून आले व पश्चिम बाजूच्या रस्त्यावर देखील सिमेंट ब्लॉक पडलेले दिसून आले. जीवितास हानी उत्पन्न होईल अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. तरी संबंधीतावर कायदेशिर गुन्हा दाखल करावा. तसेच या कामी रचना सहायक वैष्णवी गडाख व सहायक नगररचनाकार (प्रभारी) ओंकार सहाणे यांना मुख्याधिकारी यांचे वतीने प्राधिकृत करण्यात येत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!