संगमनेर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. मीनल देशमुख —
पहिल्या महिला अध्यक्षा…..
संगमनेर (प्रतिनिधी) —
संगमनेर तालुका बार असोसिएशन (वकील संघटना) अध्यक्षपदी ॲड. मीनल गुलाबराव देशमुख या 151 मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या असून उपाध्यक्षपदी ॲड. किरण सुधाकर रोहम यांची निवड झाली आहे. ॲड. मीनल देशमुख या संगमनेर बार असोसिएशनच्या कारकिर्दीत पहिल्या महिला अध्यक्षा असून त्यांना हा बहुमान मिळाल्याबद्दल सर्वच महिला वकील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
संगमनेर तालुका बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये ॲड मीनल देशमुख- कोते यांना 255 मते मिळाली विरोधी उमेदवार जनार्दन वाळुंज यांचा त्यांनी 151 मतांनी पराभव केला. तर उपाध्यक्षपदी ॲड किरण सुधाकर रोहम यांची निवड झाली. महिला उपाध्यक्षपदी ॲड. वंदना दत्तू दिघे वाबळे, सचिव पदी ॲड. अमोल कारभारी घुले, सहसचिव म्हणून ॲड. सुशांत सोमनाथ वाळे, खजिनदार ॲड. बबनराव गणपत नाईकवाडी, तर सदस्य पदी ॲड. अरुण गायकवाड, ॲड. मेघा तापडिया, ॲड. सना पठाण, ॲड. ऋषिकेश वाणी , ॲड. प्रतीक दातीर यांची निवड झाली आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या या निवडीबद्दल वकील संघटनेचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, ॲड. सुहास आहेर, ॲड. प्रदीप मालपाणी, यांच्यासह वकील संघटनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
