पद्मशाली महिला संघमच्या अध्यक्षपदी लक्ष्मी इटप
।संगमनेर प्रतिनिधी दिनांक 16
पद्मशाली महिला संघमच्या अध्यक्षपदी लक्ष्मी दत्तात्रय इटप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. येथील मार्कंडेय मंदिरात आयोजित महिला मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्षपदी वनिता शांताराम आडेप, साईसुधा विलास वनम, सेक्रेटरीपदी गिता शंकर अन्नलदास, रोहिणी भारत शंकरपल्ली, तर खजिनदारपदी वैशाली अंबादास आडेप यांची निवड करण्यात आली.

त्याचबरोबर शितल सुनिल मादास, तुळजा राजेंद्र श्रीराम, सुरेखा शंकर चन्ना, देविका लिंगमुर्ती चिंता, रेखा गणेश मादास, सुनिता सतिश आडेप, वनिता नारायण इटप, वैशाली काशिनाथ आडेप, मिनाक्षी अजय श्रीपतवाड, आशा विनय राम, इंदिरा विलास श्रीराम, पुनम सागर शिरसुल्ला, स्वाती संतोष अंकारम, स्मिता विनोद झुंजुर, वैशाली गणेश पगडाल, दिपाली सुधाकर आडेप, रूपाली व्यंकटेश वनम यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. तसेच पदमशाली समाज विश्वस्त मंडळाच्या महिला सदस्यपदी कविता पापय्या शिरसुल्ला, ज्योती नरेंद्र दुस्सा यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व महिला सदस्यांचे आजी माजी महिला सदस्यांनी अभिनंदन केले. यावेळी पद्मशाली समाज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गणेश मादास यांनी नुतन अध्यक्षांचे व महिला मंडळांचे अभिनंदन करित पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पद्मशाली महिलांच्या कष्टामुळे आज समाज प्रगतशील – निलमताई खताळ
पद्मशाली समाजातील महिला या अत्यंत कष्टाळू आणि चिकाटी वृत्तीच्या आहेत. हातमाग, विडीकाम करत आपल्या संसाराचा गाडा त्यांनी हाकला. त्यातून त्यांनी मुलांना शिक्षणाचा वारसा दिला. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून आजची तरुण पिढी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना दिसत आहे. त्यामुळे पद्मशाली समाजाची खरी ताकद या महिला आहेत, असे उद्गार यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या सुविद्य पत्नी निलमताई खताळ यांनी काढले. खताळ यांनी पद्मशाली समाज मंडळाच्या नुतन महिला अध्यक्ष लक्ष्मी इटप यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष पायलताई ताजणे, माजी नगरसेविका ज्योती भोर, कांचनताई ढोरे, दक्षिण भारतीय आघाडी प्रमुख पांडूरंग शेराल यांच्यासह महिला सदस्य उपस्थित होते.
