हरिभाऊ वराट यांची जामखेड तालुका अध्यक्ष पदी चौथ्यांदा निवड

मनरेगा अंतर्गत रोजगार सहाय्यक संघटना – नवी कार्यकारिणी जाहीर

 प्रतिनिधी दिनांक 24 

पंचायत समिती जामखेड येथील सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व रोजगार सहाय्यक बांधवांच्या उपस्थितीत अधिवेशन पार पडले. यावेळी जामखेड तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली हरिभाऊ वराट यांची सलग चौथ्यांदा  अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या अधिवेशनात संपूर्ण लोकशाही प्रक्रियेनुसार रोजगार सहाय्यक संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड यशस्वीरित्या करण्यात आली.

कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर अनिल गंगावणे, कर्जत तालुका अध्यक्ष युवराज नवसरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रवीण आहेर (कोपरगाव), राहुरी – जालिंदर रोडे, तसेच तालुका सचिव – अर्जुन तापकीर (कर्जत) हे उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे:

अध्यक्ष – हरिभाऊ वराट, उपाध्यक्ष – ज्ञानेश्वर लबडे, पिंपरखेड ग्रा.पं., सचिव मुक्तार शेख, जवळा ग्रा.पं., खजिनदार नाना सावंत, शिउर ग्रा.पं., सल्लागार – बापूराव वाळुंजकर, शाहुराव जायभाय, अमृत बारवकर, सुदाम कोल्हे, संतोष जोरे

मनरेगा योजनेचा खरा उद्देश:

महात्मा गांधी रोजगार हमी योजना (MGNREGA) ही ग्रामीण भागात काम मिळवून देण्याची घटना जनतेला मिळालेली मूलभूत हमी आहे. ग्रामीण गरीबांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे, स्थलांतर कमी करणे, आणि शेती व जलसंधारणाच्या कामात भरीव योगदान देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

रोजगार सहाय्यकांची भूमिका – योजनेचा कणा

रोजगार सहाय्यक हेच मनरेगा योजनेचे खरे यंत्रचालक आहेत. ते गावागावात योजनांची अंमलबजावणी करताना: कामांची मोजणी व नोंद, पात्र लाभार्थ्यांची निवड, डिजिटल हजेरी व मोबाईल अ‍ॅप वापर, योजनांचे नियोजन व प्रत्यक्ष कामांचे पर्यवेक्षण, अशा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यांची संघटना मजबूत असणे म्हणजे योजनेंच्या दर्जेदार अंमलबजावणीची हमी असते.

ही नवी कार्यकारिणी रोजगार सहाय्यकांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे मांडेल, प्रशिक्षण, तंत्रज्ञान व सन्मानपूर्वक कार्यपद्धतीसाठी भरीव प्रयत्न करेल.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!