जागृत महिला मंच….
संगमनेर तालुका शाखेची स्थापना
अध्यक्ष साक्षी दिघे, उपाध्यक्ष अर्चना शेळके तर अर्चना वनपत्रे यांची सचिव पदी निवड
संगमनेर प्रतिनिधी 27
लोकपंचायत संस्थेच्या बहिणा प्रकल्पांतर्गत महिलांवरील अन्याय अत्याचार विरोधात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे जागृत महिला मंच ची स्थापना केली आहे. 
दिनांक २५ फेब्रुवारी रोजी लोकांगण आडवा ओढा, संगमनेर खुर्द येथे तालुक्यातील विविध २० गावातील महिला प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत जागृत महिला मंच या संघटनेची ध्येय धोरणे आणि कार्यक्रम ठरविण्यात आले. तसेच तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.
अध्यक्ष पदावर तळेगाव येथील साक्षी दिघे यांची तर उपाध्यक्षपदी नांदुरी दुमाला येथील अर्चना शेळके यांची निवड झाली. सचिव म्हणून पेमगीरी येथील अर्चना वनपत्रे यांची निवड झाली आहे. तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनिता रोहिदास खताळ धांदरफळ खुर्द, मंदा निळे, मिर्झापूर, ज्योत्स्ना कदम संगमनेर, लक्ष्मी दशरथ तूपसुंदर गुंजाळवाडी, शितल ज्ञानदेव पांडे पिंपळगाव माथा, मुक्ता बाळासाहेब सांगळे, लता माणिक सावंत पिंपळगाव माथा, निर्मला कैलास दिघे तळेगाव यांची निवड झाली आहे.

सभेसाठी तालुक्यातून २५ प्रतिनिधी उपस्थित होते.bजयश्री जाधव, सविता पांडे, स्मिता गाडेकर, सुरेखा उबाळे, वैष्णवी जुनगडे आणि अर्चना देशमुख यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
