RCC Chess Club Sangamner च्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धेत शानदार कामगिरी

पुणे येथील स्पर्धेत पदकांसह विविध गटांत उल्लेखनीय यश

संगमनेर प्रतिनिधी –

पुणे येथे सुपर किंग्स चेस क्लब आयोजित करण्यात आलेल्या ‘खेलो दिमाग से’ बुद्धिबळ स्पर्धेत आरसीसी क्लब संगमनेरच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत क्लबचे नाव उज्ज्वल केले. विविध वयोगटांत सहभागी झालेल्या खेळाडूंनी कौशल्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत पदके तसेच उल्लेखनीय क्रमांक मिळविले.

स्पर्धेतील Under 16 गटात आयुष यशवंत बेनके याने उत्कृष्ट खेळ करत 5वा क्रमांक पटकावला. याच गटात गौरी घुले हिनेही चांगली कामगिरी करत 8वा क्रमांक मिळवून पदक आपल्या नावावर केले.

Under 11 गटात शुभम रहाणे याने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत 8वा क्रमांक मिळविला. याच गटातील श्रेयन मुळे याने स्पर्धेत 3 गुणांची कमाई करत आपली क्षमता सिद्ध केली.

Under 13 गटात श्रेया राहणे हिने चार गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आणि पदक प्राप्त केले. तसेच सृष्टी शेट्टी हिनेही स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, Under 16 गटातील सनतकुमार प्रवीण ढोले याने अंतिम फेरीपर्यंत दमदार खेळ करत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे विशेष कौतुक करण्यात आले.

या स्पर्धेच्या निमित्ताने आरसीसी चेस क्लबच्या च्या खेळाडूंनी विविध वयोगटांत केलेली कामगिरी ही संगमनेरमधील बुद्धिबळ क्षेत्रासाठी निश्चितच उत्साहवर्धक ठरली आहे. नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक अनुभवाच्या जोरावर या खेळाडूंनी आपली गुणवत्ता दाखवून दिली.

स्पर्धेतील यशाबद्दल प्रशिक्षक ऋषी चव्हाण यांनी सर्व यशस्वी तसेच सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. भविष्यातील स्पर्धांमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!