स्वातंत्र्य दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील 30 अधिकारी व अंमलदारांचा पदकाने गौरव

गुणवत्तापूर्ण, अतिउत्कृष्ट व उत्कृष्ट सेवेसाठी भारत सरकारकडून पदके जाहीर

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारकडून पोलीस दलात उल्लेखनीय व दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना विविध पदके जाहीर करण्यात आली आहेत. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील 30 पोलीस अधिकारी व अंमलदारांचा यामध्ये गौरव करण्यात आला आहे.

पोलीस सेवेत गुणवत्तापूर्ण कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, 25 वर्षांची सेवा पूर्ण केल्याबद्दल अति-उत्कृष्ट सेवा पदक, तर 15 वर्षांची सेवा पूर्ण केल्याबद्दल उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

राष्ट्रपती पोलीस पदक

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संपत मुरलीधर खैरे (सुपा पोलीस ठाणे), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शैलेश चंद्रकांत उपासने (ना.ह.स.) आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यदअली सय्यद (पोलीस मुख्यालय) यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

अति-उत्कृष्ट सेवा पदक

25 वर्षांची सेवा पूर्ण केल्याबद्दल सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शिवाजी थोरात, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मनोहर नामदेव शेजवळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यदअली सय्यद, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जबाजी खंडागळे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय गोरखनाथ लोंढे यांना अति-उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

उत्कृष्ट सेवा पदक

15 वर्षांची सेवा पूर्ण केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक किरण भास्कर शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक किरण प्रकाश शेलुकर तसेच पोलीस हवालदार सचिन वसंत पवार, रेहान अजिज शेख, कृष्णा नाना कुऱ्हे, दिगंबर रावसाहेब कारखिले, रंगानाथ जयराम नरसाळे, मल्लिकार्जुन कैलास बनकर, कृष्णा बबनराव विधाटे, राजु आप्पासाहेब सुद्रिक, संदिप कचरु पवार, संतोष बापुराव ओव्हळ, सचिन महादेव जाधव, दिपक भास्कर घाटकर, अभिजीत दत्तात्रय अरकल, सुयोग संजय सुपेकर, सुरेश चंद्रकांत माळी, माधुरी साहेबराव तोडमल, किर्ती जगन्नाथ कांजवणे, भाग्यश्री गंगाधर भिटे, राहुल भाऊसाहेब सोळुंके आणि अमोल बाबासाहेब घुले यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

भारत सरकारकडून पदकासाठी निवड झालेल्या या सर्व अधिकारी व अंमलदारांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा सन्मान जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बाब असून, पुरस्कारप्राप्त अधिकारी व अंमलदारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!