महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा सचिवपदी तुषार ओहरा यांची नियुक्ती
संगमनेर | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा सचिव पदावर तुषार शरद ओहरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांनी दि. 31 जुलै 2026 रोजी जारी केले.
नियुक्तीपत्रात नमूद केल्यानुसार, तुषार ओहरा यांनी सामाजिक कार्याची आवड, संघटन कौशल्य आणि समाजसेवेची भावना लक्षात घेऊन त्यांच्यावर अहिल्यानगर जिल्हा सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संघटनेच्या माध्यमातून गरजू, गरीब, रुग्ण तसेच कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करत संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, अशी अपेक्षाही नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संघटनेच्या नियमांचे पालन करून निष्ठा, शिस्त आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या नियुक्तीबद्दल तुषार ओहरा यांचे विविध सामाजिक, राजकीय आणि कामगार क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

