प्रशासन लोकाभिमुख करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
महसूल दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क :
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासात्मक उपक्रमांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने योजनांची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करावी. नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न वेळेत सोडविणारे आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारे लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, वर्षा पवार, शारदा जाधव, भूसंपादन अधिकारी गौरी सावंत, हेमा बडे, भारती सागरे यांच्यासह तहसीलदार नागेश गायकवाड, पाथर्डी तहसीलदार उद्धव नाईक आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, महसूल विभाग नेहमी अग्रेसर असणारा विभाग आहे. शासकीय योजनांच्या प्रसिद्धीपासून ते आपत्ती व्यवस्थापनापर्यंत महसूल विभाग कार्य करत असतो. शासनाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय सेवा यांचा केंद्रबिंदू सामान्य नागरिक असला पाहिजे. प्रशासनातील प्रत्येक घटकाने समन्वयाने, जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम केल्यास लोकांचा शासन-प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल. त्यामुळे प्रभावी प्रशासन उभारण्याचा संकल्प प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी प्रास्ताविकातून महसूल दिनाचे महत्त्व, महसूल प्रशासनाची भूमिका तसेच नागरिकांना पारदर्शक आणि तत्पर सेवा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महसूल विभाग हा शासन आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा असून, लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी नमूद केले.

पुरस्कार प्राप्त अधिकारी व कर्मचारी
अतुल पंडीत चोरमारे, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. १, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर, उद्धव बाळकृष्ण नाईक, तहसीलदार, पाथर्डी, मयुर मच्छिंद्र बेरड, नायब तहसीलदार, गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर; दत्तात्रय अनिल गंधाडे, सहायक महसूल अधिकारी, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर; संदिप रघुनाथ बनसोडे, महसूल सहायक, गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर, विजय सिंग पन्नालाल नायमाने, मंडळ अधिकारी, शिर्डी, महेंद्र प्रकाश शिंदे, ग्राम महसूल अधिकारी, चिंभळे, किसन भागवत भालेराव, शिपाई, सामान्य प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर, सचिन कोंडीभाऊ ढेरंगे, महसूल सेवक, तहसील कार्यालय, संगमनेर यांचा समावेश आहे.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी
जनगणना २०२७च्या पहिल्या टप्प्यातील (घरयादी आणि घरगणना) उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दादासाहेब रघुनाथ गिते, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी, नागेश बाळकृष्ण गायकवाड, तहसीलदार सा.प्र. तथा अतिरिक्त जनगणना अधिकारी, शंकर विजय रोडे, नायब तहसीलदार सा.प्र. तथा अतिरिक्त जनगणना अधिकारी, उद्धव बाळकृष्ण नाईक, तहसीलदार तथा चार्ज अधिकारी, पाथर्डी, सचिन अण्णासाहेब पोटे, सहायक महसूल अधिकारी, धनश्री सुधाकर पवार, मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी, अकोले न.पा., गौरव दळवी, नायब तहसीलदार तथा अतिरिक्त चार्ज अधिकारी, अहिल्यानगर तहसील, मास्टर ट्रेनर हेमंत पाटील, राहाता तहसील; अजय साळवे, जामखेड न.पा., विकास पोपट बाचकर, पर्यवेक्षक, नेवासा तहसील, युवराज रामचंद्र भोसले, प्रगणक, राहुरी न.पा., भागवत श्रीधर रामराव, फिल्ड ट्रेनर, शेवगाव तहसील, निलेश निवृत्ती इंगळे, चार्ज अधिकारी लिपिक, श्रीरामपूर तहसील यांचा समावेश आहे.
