संगमनेरमध्ये गोवंश कत्तलीचा अड्डा उद्ध्वस्त !
नऊ जण ताब्यात, दोन मुख्य सूत्रधार फरार
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, स्थानिक गुन्हे शाखेने कादरीनगर परिसरात धडक कारवाई करत तब्बल १ हजार ९०० किलो गोमांस जप्त केले आहे. गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी मात्र फरार झाले आहेत. पोलिसांनी छोटा हत्ती वाहन, कुऱ्हाडी, सुरे आणि वजनकाट्यासह एकूण ९ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी तपास पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना कादरीनगर येथील गौसो रजा मस्जिदजवळील गल्ली क्रमांक २ व ३ येथे गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

सोमू उर्फ आतीक रफीक कुरेशी आणि त्याचा साथीदार अनस सरवर कुरेशी हे अन्य काही इसमांच्या मदतीने गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली. त्यावेळी काही इसम प्रत्यक्ष गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या नऊ जणांची नावे
* सद्दाम मोहम्मद जावेद कुरेशी (वय २९), रा. मुगलपूरा, जुना राजवाडा, संगमनेर.
* गुलाम जर्रानी रब्बानी सौदागर (वय १९), रा. भारतनगर, हावडाब्रीज, संगमनेर.
* गुलाम मुस्तफा मुश्पीक शेख (वय २०), रा. गल्ली क्रमांक २, जमजम कॉलनी, संगमनेर.
* आवेज जानू कुरेशी (वय २१), रा. गल्ली क्रमांक ५, मदीनानगर, संगमनेर.
* आसीफ इक्बाल खान (वय ३२), रा. मदीनानगर, संगमनेर.
* कैस अश्पाक कुरेशी (वय २७), रा. गल्ली क्रमांक २, मदीनानगर, संगमनेर.
* याकुब रज्जाक कुरेशी (वय ४२), रा. गल्ली क्रमांक ५, मदीनानगर, संगमनेर.
* परवेश जानू कुरेशी (वय २६), रा. गल्ली क्रमांक ५, मदीनानगर, संगमनेर.
* एक विधिसंघर्षित बालक (वय १७), रा. गल्ली क्रमांक ३, मदीनानगर, संगमनेर.

दोन मुख्य आरोपींसह वाहनमालक फरार
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, अनस सरवर कुरेशी (रा. हावडा ब्रीज, संगमनेर) आणि सोमू उर्फ आतीक रफीक कुरेशी (रा. मोगलपूरा, संगमनेर) यांच्या सांगण्यावरून गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणातील अनस सरवर कुरेशी आणि सोमू उर्फ आतीक रफीक कुरेशी हे दोघेही फरार आहेत. तसेच छोटा हत्ती वाहन क्रमांक एमएच-१४-सीडी-०८३९ या वाहनाचा मालक, ज्याचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही, तोदेखील फरार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी ताब्यातील आरोपी, फरार आरोपी अनस सरवर कुरेशी, सोमू उर्फ आतीक रफीक कुरेशी तसेच छोटा हत्ती वाहनाचा फरार मालक अशा एकूण संबंधित व्यक्तींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) मधील कलम ५(अ), ५(ब), ५(क) आणि ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

