हॉटेलमध्ये जुगाराचा डाव रंगला अन् एलसीबीचा छापा !
१२ जण जाळ्यात, मालक फरार
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून, कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील हॉटेल तुळजाभवानीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत ४ लाख २७ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जुगार क्लबचा मालक बालाजी राजू चौघुले याच्यासह एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लबचा मालक सध्या फरार आहे.

गोपनीय बातमीदारामार्फत हॉटेल तुळजाभवानी, वडारवस्ती, सिद्धटेक, ता. कर्जत येथे काही इसम पैसे लावून ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता हॉटेल तुळजाभवानी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोलाकार पद्धतीने बसून काही जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकून खालील १२ जणांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे
१) राहुल रोहिदास ननवरे (वय ३४), रा. जलालपूर, ता. कर्जत.
२) बाळासाहेब शिवाजी काटकर (वय ४५), रा. शिरापूर, ता. दौंड, जि. पुणे.
३) सागर लक्ष्मण खुडे (वय ३८), रा. शिरापूर, ता. दौंड, जि. पुणे.
४) आश्पाक वजीर इनामदार (वय ३३), रा. देऊळगाव राजा, ता. दौंड, जि. पुणे.
५) दिगंबर लक्ष्मण वाघमोडे (वय ४६), रा. दौंड, ता. दौंड, जि. पुणे.
६) अनिल गोरख तांदळे (वय ३२), रा. जलालपूर, ता. कर्जत.
७) सोमनाथ नागनाथ ननवरे (वय ३९), रा. जलालपूर, ता. कर्जत.
८) महादेव चांगदेव गोधडे (वय ३२), रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा.
९) राजू रघुनाथ लष्करे (वय ४२), रा. वडारवस्ती, सिद्धटेक, ता. कर्जत.
१०) सोमनाथ शिवाजी खोमणे (वय ३२), रा. सिद्धटेक, ता. कर्जत.
११) बाबुराव उर्फ अनिल परशुराम विठेकर (वय ४१), रा. सिद्धटेक, ता. कर्जत.
१२) दत्ता महादेव तांदळे (वय ३४), रा. सिद्धटेक, ता. कर्जत.
![]()
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे जुगार क्लबच्या मालकाबाबत अधिक चौकशी केली असता, सदर जुगार क्लब हा बालाजी राजू चौघुले (रा. वडारवस्ती, सिद्धटेक, ता. कर्जत) याचा असल्याचे समोर आले. तो जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. मात्र, बालाजी राजू चौघुले हा कारवाईदरम्यान फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण ४ लाख २७ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी वरील आरोपींविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुरनं. ६०६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास व कारवाई कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, प्रताप देवकाते, अमोल कोतकर, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे आणि भगवान धुळे यांनी केली.





