गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार – प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे

सातारा / प्रतिनिधी —

माहिती तंत्रज्ञानामुळे आजच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनेक संधी व आव्हाने निर्माण झालेली आहेत. विद्यार्थ्यांपुढील आव्हाने लक्षात घेऊन समाजातील सर्व घटकातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने त्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिवपदी प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांची नुकतीच फेरनिवड झाली. त्याबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभागाने सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.  

   

कार्यक्रमासाठी प्रा. डॉ.विद्या नावडकर, डॉ. आबासाहेब उमाप, प्रा. डॉ. प्रकाश टोने, प्रा. डॉ. जी. एस. भोसले, प्रा. डॉ. एस. एस. पवार, प्रा. डॉ. संजीव बोडखे, प्रा. डॉ. शेख, प्रा. दिलीप पवार, प्रा. डॉ .संजयकुमार सरगडे, प्रा.डॉ. राम कवितके उपस्थित होते.

डॉ. शिवलिंग मेनकुदळे पुढे म्हणाले की, बहुजन समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षित करण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी करणे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण कार्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन आजच्या स्पर्धेच्या युगात बहुजन समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना शिक्षण प्रवाहामध्ये आणून त्यांना रोजगाराभिमुख, कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी आपण रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विद्या नावडकर यांनी करून छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभाग अंतर्गत शैक्षणिक वर्ष-२०२५-२६ मध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम, कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. प्रा. डॉ. संजयकुमार सरगडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!