पद्मरसिक शाह विद्या मंदिर : यशाची परंपरा कायम
राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश
- संगमनेर प्रतिनिधी दि. 26
पद्मरसिक शाह विद्या मंदिर (संगमनेर) या शाळेने आपल्या यशस्वी परंपरेला साजेसा ठसा उमटवत मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत अफाट यश संपादन केले आहे. २ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, शाळेच्या १०० विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचा झेंडा उंचावला आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, इयत्ता तिसरीतील अनन्या जयसिंग लामटुळे हिने ३०० पैकी ३०० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तसेच, इयत्ता दुसरीतील आर्या सचिन मोरे, नीलांश सुदर्शन पारख आणि प्रगती योगेश वर्पे या तिघांनी १५० पैकी १४६ गुण मिळवून राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. स्वराली दिगंबर बोऱ्हाडे हिने १५० पैकी १४४ गुण मिळवत राज्यात चतुर्थ क्रमांक मिळवला.

इयत्ता चौथीतील लक्ष्मीनंदन अमोल गडगे याने ३०० पैकी २९४ गुण मिळवून राज्यात चतुर्थ क्रमांक, तर स्मिरा निखिल नवले हिने ३०० पैकी २९२ गुण मिळवत राज्यात पंचम क्रमांक मिळवला आहे.bयंदा शाळेच्या ७ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत आपले स्थान पक्के केले आहे.
जिल्हास्तरावर देखील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली आहे. इयत्ता पहिलीतील ३, दुसरीतील १५ आणि तिसरीतील १ विद्यार्थिनी असे एकूण १९ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले.

तालुका स्तरावर ७४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून, यामध्ये पहिलीतील ४, दुसरीतील ३२, तिसरीतील २४ व चौथीतील १४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील मार्गदर्शक शिक्षक उल्का गायकवाड, ज्ञानेश्वर गाडेकर, शंकर चौधर, भाऊसाहेब रुपवते, सविता कांबळे, वंदना यादव, प्रतिमा पांडे, ज्योती रेखी, रेवती बोरुडे, शैला काळे, राधिका कर्पे, अर्चना काळे, अश्विनी टकले, सुविधा सालपे आणि शिल्पा पंधारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शाळेच्या या गौरवशाली कामगिरीबद्दल बालशिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष मुकुंददादा गाडगीळ, सचिव नीलाताई जोशी, मुख्याध्यापिका उल्का गायकवाड व गणेशनगर शाखेचे इंचार्ज ज्ञानेश्वर गाडेकर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.
