चंदनापुरी सावरगावतळ रस्त्याचे काम गुणवत्तेचे करावे – आमदार खताळ

चंदनापुरी सावरगावतळ पिंपळगाव माथा जवळे बाळेश्वर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

संगमनेर प्रतिनिधी दि. 26

चंदनापुरी सावरगाव तळ पिंपळगाव माथा जवळे बाळेश्वर या रस्त्यासाठी साडेसहा कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत. ठेकेदाारांवर कोणाचाही दबाव राहणार नाही. टक्केवारीचा तर प्रश्नच येत नाही,  त्यामुळे ठेकेदाराने या रस्त्याचे काम चांगल्या गुणवत्तेचे करावे अशी तंबीच आमदार अमोल खताळे यांनी दिली आहे.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे चंदनापुरी सावरगावतळ पिंपळगाव माथा जवळे बाळेश्वर रस्त्या रुंदीकरण आणि डांबरीकरण तसेच कौठमाळा ते काशी आई मंदिर सावरगाव तळ या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यास पीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, शिव सेनेचे तालुका आध्यक्ष रामभाऊ राहाणे, भाजप जेष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शिव सेना उपतालुकाप्रमुख बादशाह गुंजाळ, सुशील शेवाळे, अजित जाधव, प्रमोद सावरगावतळच्या सरपंच अनिता नेहे, बाळासाहेब शेटे, रावसाहेब थिटमे, पोपट नेहे, शरद नेहे, दादाभाऊ शिरतार, एम डी रहाणे, बाळू सरोदे, नितीन रहाणे, बाबासाहेब रहाणे, संजय भालेराव, योगेश घोगरे, शांताराम बोऱ्हाडे, किरण बोऱ्हाडे, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलेचे उपविभागीय अभियंता जगदीश कडाळे, डी एम ठाकरे, ग्रामविकास अधि कारी रामदास काळे, सावरगाव तळच्या ग्रामसेविका माधुरी शिखरे आदी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, रस्त्याचे काम होत असताना कुठलीही अडचण येऊ देऊ नका.आली तर सावरगावतळ आणि चंदनापुरी येथील शेतकऱ्यांनी समन्वयातून मार्ग काढावा. पूर्वीसारखे आता कुणाचाही ठेकेदारांवर दबाव राहिला नाही. टक्केवारीचा तर विषय येतच नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम चांगल्या गुणवत्तेचे करावे अशी सक्त ताकीद खताळ यांनी या रस्त्याच्या ठेकेदाराला दिली.

संगमनेर तालुक्यातील रस्त्याचे, पाण्याचे तसेच इतर काही विकास कामे राहिली असेल तर ती सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.परंतु आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभे रहा. रस्त्याचे काम होत असताना ठेकेदाराला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याची दोन्ही गावातील नेत्यांनी दक्षता घ्यावी. रस्त्याचे काम ठेकेदाराने चांगल्या गुणवत्तेचे केले नाही तर त्यात दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत तुम्ही निश्चित राहा अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दोन्हीही गावच्या नागरिकांना दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे यांनी केले तर आभार सावरगावतळ शिवसेनेचे शरद नेहे यांनी मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!