वेल्हाळेच्या दगडी साठवण बंधारा दुरुस्ती कामाचा शुभारंभ
काम लवकरात लवकर पूर्ण करावे — आमदार अमोल खताळ
संगमनेर प्रतिनिधी दि. 27
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी वेल्हाळेच्या पाझर तलावात सोडले तर या भागातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनीआपल्याकडे केली आहे. त्या नुसार या पाझर तलाव दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्या असून जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ते पूर्ण करावेत अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील पाझर तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते. व्यासपीठावर सरपंच विष्णू आव्हाड, जलसंधारण विभागाचे उपअभियंता कपिल बिडगर, किशोर भांड, अशोक ननावरे, बाळासाहेब जेडगुले, सतीश सोलाट, शांताराम सोनवणे, भानुदास सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, रोहन भागवत, गणेश सोनवणे, योगेश सोनवणे, शंकर भांड, हरिभाऊ भांड गोकुळ सोनवणे आदी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, येथून मागील कालावधीत उन्हाळ्यात पाणी होते का असा सवाल करत शेतीला पाणी मिळावे तसेच पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी जल संपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विशेष प्रयत्नातून उन्हाळ्याच्या कालावधीत शेतीसाठी प्रवरानदी पात्रातून तसेच निळवंडे डाव्या व उजव्या कालव्या तून पाणी सुरू आहे. या पाझर तलावात जर कोणाचे अतिक्रमण असेल तर ते काढून घ्यावे भविष्यात तुम्हालाच या पाझर तलावातुन पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी प्रत्येकाने समन्वयातून मार्ग काढून अधिकाऱ्यांना सर्वांनी सहकार्य करावे आणि या पुढील काळात वेल्हाळे गावात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही यासाठी या पाझर तलावाची जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंदाज पत्रकानुसार दुरुस्ती करावी.
