संगमनेर मध्ये थोरात – तांबेंचा डंका..!
शिवसेना महायुतीचा सुपडा साफ..!!
डॉ. मैथिली तांबे 16 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी
30 पैकी 27 जागांवर प्रचंड मोठा विजय
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या संगमनेर नगर परिषदेवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी, आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीने विजयाचा डंका वाजवला असून आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महायुतीच्या पॅनलचा पूर्णपणे “सुपडा साफ” झाला आहे. एकूण 30 जागांपैकी सेवा समितीचे 27 उमेदवार निवडून आले असून अवघी एक जागा महायुतीला मिळाली आहे. तर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

नगराध्यक्षपदी डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे या 16 हजार मतांनी विजयी झाल्या असून शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. संपूर्ण संगमनेर शहरवासीयांनी आमदार खताळ यांना अवघ्या एका वर्षात मोठा राजकीय धक्का दिला असल्याचे या निकालानंतर बोलले जात आहे.

डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात एक नंबर !
डॉक्टर मैथिली तांबे यांना 28 हजार 397 इतकी मते मिळाले असून विरोधी उमेदवार शिवसेनेच्या सुवर्णा खताळ यांना 11 हजार 989इतकी मते मिळाली आहेत. डॉक्टर मैथिली तांबे या महाराष्ट्रात सर्वात जास्त फरकाने विजयी झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. तर संगमनेर नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी असलेल्या 30 जागांपैकी 27 जागांवर सेवा समितीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या सर्व उमेदवारांनी विरोधकांवर मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत खाते देखील उघडता आलेले नाही. तर अपक्ष म्हणून योगेश उर्फ चिकू जाजू यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत लक्षवेधक विजय मिळविला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 15 मधून देखील माजी उपनगराध्यक्ष इसहाकखान पठाण यांच्या पत्नीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दिलशाद अजीज शेख या विजयी झाल्या आहेत. तर साक्षी सूर्यवंशी ह्या शिवसेनेच्या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि विद्यमान आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीचे खालील उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत.
दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, भारत बोऱ्हाडे, शैलेश कलंत्री, डॉक्टर दानिश खान, अमजद पठाण, नितीन अभंग, किशोर पवार, किशोर टोकसे, गजेंद्र अभंग, सौरभ कासार, गणेश गुंजाळ, मुजीबखान पठाण, नूरमोहम्मद शेख, शोभा पवार, प्रियंका शहा, नंदा गरुडकर, विजया गुंजाळ, सरोजना पगडाल, दिपाली पंचारिया, मालती डाके, वनिता गाडे, प्राची कवडे, अनुराधा सातपुते, सीमा खटाटे, शकीला बेग, अर्चना दिघे.
योगेश उर्फ चिकू जाजू (अपक्ष ), दिलशाद शेख (अपक्ष), साक्षी सूर्यवंशी (शिवसेना)
