बालपण स्कूलमध्ये राष्ट्रीय भूगोल दिवस उत्साहात साजरा

संगमनेर दि. 14

बालपण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जागतिक भूगोल दिनानिमित्त वेगवेगळे भूगोल विषयक मॉडेल्सचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

शालेय जीवनातील बहुतेकांचा नावडता विषय मात्र तेवढाच उत्साहवर्धक विषय म्हणजे भूगोल. या भूगोलाच्या विषयी जनसामान्यात असणारी भीती दूर व्हावी व त्याचे महत्त्व लोकांना समजावे. या उद्देशाने भारत सरकारकडून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय भूगोल दिन.

पाचवी ते नववी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवत (माती व मातीचे प्रकार, खडक व खडकांचे प्रकार, वाहतूक व्यवस्था, शेती, शेतीपूरक व्यवसाय, प्रमाणित वजन मापाची पद्धत, मानवी सांगाडा, साखर कारखाना, पवन ऊर्जा, चंद्रयान, पृथ्वी व ग्रह, पृथ्वीचे अंतरंग, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, ज्वालामुखी, आपली सूर्यमाला, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सूर्यग्रहण इ.) अशा अनेक विषयांवर आपले मॉडेल्स सादरीकरण करण्याचे काम केले.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भूगोलाविषयीची आवड निर्माण झाली.तसेच भौगोलिक गोष्टींविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. मॉडेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत झाली. बालपण स्कूलच्या प्रमुख सोनाली मुंढे व सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मॉडेल्स बद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!