संगमनेर तालुक्यातील निमोण येथे अपघातात दोन जण जागीच ठार ; एक गंभीर जखमी
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यामध्ये लोणी ते नांदूर शिंगोटे रोडवर निमोण गावात कंटेनर व मोटार सायकल यांची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकल वरील दोघेजण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोणी ते नांदूर शिंगोटे रोडवर कंटेनर नंबर जी जे 15 ए व्ही 6656 व पल्सर मोटर सायकल नंबर एम एच 15 एच के 5384 यांची समोरासमोर धडक होऊन सदर अपघातात 1)कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय 30, राहणार नांदूर शिंगोटे) 2) युवराज धोंडीबा मेंगाळ (वय29) हे जागेवर मयत झाले आहेत. 2) संदीप संतोष आगिवले (राहणार गर्दनी, तालुका अकोले) यास गंभीर मार लागलेला असून त्याच्यावर दोडी, तालुका सिन्नर येथे उपचार चालू आहेत. त्याची परिस्थिती गंभीर आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलेला आहे.

