राष्ट्र सेविका समितीचे संगमनेरमध्ये २५ ऑक्टोबरला पथसंचलन !

संगमनेर प्रतिनिधी : 

विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त तसेच राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने राष्ट्र सेविका समिती, उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने संगमनेर येथे रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सघोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘संघटन, सेवा, संस्कार’ हा विचार घेऊन आयोजित करण्यात येणाऱ्या या पथसंचलनातून समितीच्या कार्याचा आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पनेचा संदेश दिला जाणार आहे.

या पथसंचलनाला दुपारी ४ वाजता मातोश्री रू. दा. मालपाणी विद्यालय (शारदा शाळा), अकोले नाका, संगमनेर येथून प्रारंभ होईल. त्यानंतर माळीवाडा, चावडी, मेनरोड, सय्यद बाबा चौक, तेलीखुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक, रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक आणि नगरपालिका मार्गे पथसंचलन पुन्हा शारदा विद्यालय येथे पोहोचेल. तेथे पथसंचलनाची सांगता होणार आहे.

या सघोष पथसंचलनात राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी पूर्ण गणवेशात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कार्यवाहिका यांनी केले आहे. तसेच विजयादशमीच्या उत्सवात नागरिकांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!