तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील तीन शाळकरी मुली या खेळण्यासाठी गेल्या असता शेततळ्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनुष्का सोमनाथ बढे  (वय – ११), सृष्टी उत्तम डापसे (वय – १३), वैष्णवी अरुण जाधव (वय – १२) अशी या दुर्दैवी मुलींची नावे आहेत.

शनिवारी त्या शाळेत गेल्या होत्या. त्यानंतर जेवण करून त्या सोमनाथ बढे यांच्या शेताकडे गेल्या. त्या ठिकाणी सुरू असलेल्या पण अर्धवट काम झालेल्या शेततळ्यात पावसाचे पाणी साचले होते. या मुली या पाण्यात खेळण्यासाठी गेल्या असता तळ्यातील खोलगट असलेल्या भागाचा अंदाज न आल्याने तिघीही बुडाल्या. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सदर घटन समजताच गावात व परिसरात शोककळा पसरली आहे. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटस्थळी सहकाऱ्यांसह भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!