संगमनेर कचरा डेपोला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करणार — नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर खुर्द येथे असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या कचरा डेपोला अचानक आग लागली होती. ही आग नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली असली तरी या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग कशामुळे लागली याची सखोल चौकशी करणार असल्याचे नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे यांनी स्पष्ट केले आह.
शहरापासून जवळच असलेल्या संगमनेर खुर्द येथे नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. ह्या कचरा डेपोला सकाळी आग लागली होती. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आणि कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. यासाठी अग्निशमन बंब जेसीबीचा देखील वापर करण्यात आला. नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीत आंबे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन माहिती घेतली.
कचरा डेपोला आग कशामुळे लागली हे तपासणे गरजेचे आहे. आग लावण्यात आली की लागली अशीही चर्चा असून आगीचे कारण शोधण्याचा नगरपालिका प्रयत्न करणार आहे. दरम्यान नगराध्यक्ष तांबे यांनी आग कशामुळे लागली याचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


