गावठी पिस्तुलासह गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक !
प्रतिनिधी —
सुमारे दीड किलो गांजा सह गावठी पिस्तूल घेऊन दोघेजण राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विक्री करता येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह छापा टाकून दोघाजणांना अटक केली आहे.

जॉन कॅसिनो परेरा, (वय 36) व अब्दुल वाहद सय्यद शाबिर (वय 31, दोघे राहणार अहमदनगर ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडे देशी तीन काडतुसांसह देशी बनावटीचे पिस्तूल व सोबतच्या मोपेड गाडीच्या डिक्की मध्ये लपवलेला 1440 gm गांजा मिळून आला. पोलिसांनी एकूण 10 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून NDPS कायद्यान्वये (CHANCE Raid) व Arms Act कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार गायकवाड सुरज, पोलीस हवालदार राहुल यादव, पोलीस हवालदार विकास साळवे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, पोलीस नाईक प्रवीण अहिरे, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करत आहेत.

