गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक ; दोघेजण पळाले
दोन गावठी कट्टे चार जिवंत काडतुसे जप्त
प्रतिनिधी —
अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास या ठिकाणी सापळा रसून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टे विक्रीसाठी येणाऱ्या दोघांना पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

विकास सुधाकर सरोदे (वय – 23 वर्षे, रा. गुंजाळे ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर) असे एका आरोपीचे नाव असून दुसरा आरोपी नागरदेवळे गावाच्या शिवारात वारुळवाडी गावाकडे जाणारे रोडवर पकडला असून त्याचे नाव ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट (वय – 33 वर्षे, रा. मोरे चिंचोरा, ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर) असे आहे.

तर लखन सुधाकर सरोदे (रा. गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर) तसेच भैया शेख (पुर्ण नांव गांव माहित नाही. रा. कुकाणा, ता. नेवासा, जि. अहमदनगर) हे दोघेजण पळून गेले आहेत.

दोन्ही आरोपींकडून दोन गावठी कट्टे आणि चार जिवंत काढत असे जप्त करण्यात आली आहे हे दोन्ही आरोपी गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती दोन्हीही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, संदिप चव्हाण, संतोष खैरे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड संभाजी कोतकर, प्रमोद जाधव, अरुण मोरे, यांनी ही कारवाई पार पाडली.
