वेश्या व्यवसायावर छापा ; चार महिलांची केली सुटका ! 

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे पुन्हा चव्हाट्यावर

प्रतिनिधी —

संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिसांनी पठार भागातील पोखरी बाळेश्वर या ठिकाणी छापा घालून वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका पश्चिम बंगालमधील महिलेसह चार महिलांची सुटका केले असून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे. तर काही ग्राहकांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोखरी बाळेश्वर शिवारात, (ता. संगमनेर) येथे महीला वैशाली उत्तम फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर शिवार, ता.संगमनेर) ही आर्थिक फायदया करीता मुलींना पैशाचे आमिष देऊन देह व्यापारास प्रवृत्त करुन त्यांना स्वतःच्या मालकीच्या शेतामधील पत्र्याचे शेडमध्ये जागा उपलब्ध करुन देवुन त्यांचे कडुन देह विक्री व्यापार करुन घेत होती.

सदर ठिकाणी एक बनावट ग्राहक व रोख रक्कमे सह पाठविण्यात आले असता. त्यानी  अंदाजे रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना सदर ठिकाणी येण्या बाबत ईशारा म्हणून मोबाईल वरुन मिसकॉल दिला. त्यानंतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वैशाली उत्तम फटांगरे हिच्या पत्र्याचे शेडवर छापा टाकला आणि  चार पिडीत महिलांची सुटका केली.

1) वैशाली उत्तम फटांगरे (वय 48 वर्षे रा. पोखरी बाळेश्वर शिवार, ता. संगमनेर) 2) सोमनाथ यादव सरोदे (रा. आनंदवाडी ता.संगमनेर, (फरार) 3) दीपक उत्तम फटांगरे (वय 21 वर्षे रा. पोखरी बाळेश्वर ता.संगमनेर) यांनी संगनमत करुन पुरुष आरोपी 4) सागर वसंत लेंडे (वय 25 वर्षे रा.नांदुर खंदरमाळ ता.संगमनेर) 5) रामदास अशोक मोरे (वय 29 वर्षे रा. धुमाळवाडीरोड अकोले ता.अकोले) 6) शुभम बाळासाहेब मतकर (वय 22 वर्षे रा.निमज ता.संगमनेर) या ग्राहकांबरोबर शरीर संबध करण्याकरीता जागा उपलब्ध करुन देवून कुंटनखाना चालवून पिडीत महिलांना त्यांचे इच्छे विरुध्द वेश्यागमनाकरीता प्रवृत्त करुन त्यांना पुरुष गिर्‍हाईकांना दाखवुन त्यांच्याकडुन वेश्या व्यवसाय करुन घेतला व त्या मिळण्याच्या पैशावर आपली उपजिवीका भागवून अवैधरीत्या कुंटनखाना चालविला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंटनखान्यासाठी लागणारे साहित्या, मोबाईल, रोख रक्कम, वाहने असा एकुण 4 लाख 40 हजार – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महिला पोलीस उप निरीक्षक पल्लवी गोविंद वाघ, (नेम. संगमनेर तालुका पोलीस स्टेशन) यांच्या फिर्यादी वरुन घारगांव पोलीस स्टेशन मध्ये रजि. नं. 36/2024 भा.द.वि. कलम 370,34 सह स्त्रीया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

महिला आरोपी वैशाली उत्तम फटांगरे हिच्या विरुध्द घाररगांव पोलीस स्टेशन येथे यापुर्वी घारगांव पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 406/2022 स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, संगमनेर व पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, घारगांव पोलीस स्टेशन पोना राहुल डोके, पोकॉ राहुल सारबंदे, पोहेकॉ अनिल कडलग, पोहेकॉ संतोष फड, मपोकॉ/ ताई शिंदे, नेम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, संगमनेर व पो.उप.निरी. उमेश पतंगे, पोकॉ प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, नामदेव बिरे, नेम. घारगांव पोलीस स्टेशन, पल्लवी गोविंद वाघ, महिला पोलीस उप निरीक्षक, नेम. संगमनेर तालुका पोलीस स्टेशन यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला आह. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर घारगांव पोलीस स्टेशन हे करित आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!