संगमनेर शहरात महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र पळवले !
प्रतिनिधी —
घरफोड्या, बस स्थानकावरील होणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोऱ्या, पाकीट माऱ्या, रोजच्या मोटरसायकल चोरी सर्व प्रकारांनी आणि चोरट्यांनी संगमनेर शहरात धुमाकूळ घातलेला असतानाच आता एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र ओढून नेल्याची घटना संगमनेर शहरात घडली आहे.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोदार इंग्लिश मीडियम स्कूल जवळील कॉर्नर वर अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल वर येऊन भारती वनम यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मनी मंगळसूत्र ओढून चोरून नेले आहे.

भारती मधुकर वनम (रा. मालाड रोड, संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून संगमनेर शहर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पारधी हे करत आहेत.
