घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर एक लाख रुपये लुटले !
प्रतिनिधी —
वेश्याव्यवसाय आणि जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांनी सातत्याने बदनाम झालेले घारगाव पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक पुणे महामार्गावर बोटा गावच्या शिवारात एका व्यक्तीचे अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये रोख लुटून नेले आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, राहुल सुदाम गाडेकर हे पुणे नाशिक महामार्गावरील बोटा गावच्या शिवारात माळवाडी येथून जात असताना त्यांच्या गाडीचा काहीतरी आवाज आल्याने गाडी रोडच्या कडेला उभे करून बघण्यासाठी ते थांबले. त्याचवेळी त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम येऊन थांबले. हे दोन अज्ञात मदतीसाठी आलेले असतील असे गाडेकर यांना वाटले म्हणून ते त्यांना काही न बोलता गाडीची देखरेख करत होते. त्यानंतर काही वेळाने ते दोघे तेथून गायब झाले. गाडेकर हे त्यांच्या गाडीमध्ये बसून पुण्या कडे जाण्यास निघाले असता त्यांच्या लक्षात आले की गाडीमध्ये असणाऱ्या बागेतील रोख रक्कम एक लाख रुपये त्या दोन अज्ञात इसमांनी चोरून नेली आहे.

त्यामुळे राहुल गाडेकर (रा. बोटा, ता. संगमनेर) यांनी त्या दोन अज्ञात इसमां विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक आर. के. कोरडे हे करीत आहेत.

