वडगाव पान मध्ये दुकान फोडून देशी दारू चोरली !
चोरट्यांनी केली बॉबी संत्रा ची लयलूट…
प्रतिनिधी —
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव पान गावाच्या शिवारातील चोऱ्या, घर फोडण्याचे सत्र चालूच आहे. काही महिन्यांपूर्वी वडगाव पान गावात एका पाठोपाठ चोऱ्या होत होत्या. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कुठलीच कारवाई होत नव्हती. या चोऱ्या कशातरी बंद झाल्या. त्यानंतर आता पुन्हा वडगाव पान मध्ये एक देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी बॉबी संत्रा दारूच्या बाटल्या चोरून नेल्या आहेत.

वडगाव पान गावात असलेल्या एस. एस. जहागीरदार यांच्या सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील बॉबी संत्रा या देशी दारूचे सोळा बॉक्स 46 हजार 560 रुपये किमतीचे दारूचे चोरून नेले आहेत. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे.

सुरेश गेणराज काशीद (रा. वडगाव पान, तालुका संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार जायभाये हे पुढील तपास करीत आहेत.

