सराईत गुन्हेगार रवींद्र ऊर्फ बंटी साहेबराव ऊर्फ आबासाहेब मदने स्थानबद्ध !
प्रतिनिधी —
अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सराईत गुन्हेगार बंटी मदने यास नाशिक कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु. गावातील रवींद्र ऊर्फ बंटी साहेबराव ऊर्फ आबासाहेब मदने (वय – 21 वर्षे, रा. आश्वी बुद्रुक, ता.संगमनेर, जि. अहमदनगर) याने आश्वी व घारगाव पोलीस स्टेशन हदिदमध्ये सन २०१८ ते सन २०२३ या कालावधीत त्याचे साथीदारांचे मदतीने सराईतपणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, लोकांना मारहाण करुन गंभीर दुखापत करणे, हातात घातक हत्यार घेवुन शिवीगाळ दमदाटी करणे, गैरकायदयाची मंडळी जमवून मारहाण करणे, सार्वजनिक ठिकाणी दंगा करुन दहशत निर्माण करणे, धमकी देणे, गृहअतिक्रमण करणे, सरकारी आदेशाचा भंग करणे अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र ०७ व अदखलपात्र ०९ या प्रमाणे गुन्हे केलेले आहेत.

दाखल गुन्हयात वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याच्या वर्तणात काहीएक सुधारणा होत नसल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी तत्कालिन पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आश्वी पोलीस स्टेशन यांनी MPDA प्रस्ताव तयार करुन सोमनाथ वाघचौरे उप विभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर व स्वाती भोर तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांच्या मार्फत राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना सादर केला होता.

वरील प्रस्तावाची व सोबतच्या कागदपत्रांची सिदधाराम सालीमठ जिल्हादंडाधिकारी अहमदगनर यांनी पडताळणी करुन अहमदनगर जिल्हयातील सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी करीता इसम नामे रवींद्र ऊर्फ बंटी साहेबराव ऊर्फ आबासाहेब मदने यास महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, व्हिडिओचाचे, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंच्या काळा बाजारात सामील असलेल्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालने बाबतचा अधिनियम सन 1981 ( क्रमांक L.V) (सुधारणा अधि.१९९६, २००९ व २०१५ ) चे कलम 3 (1) अन्वये ” धोकादायक व्यक्ती” म्हणुन १ वर्षाकरीता स्थानबध्द केलेचा आदेश दि ९ / २ / २०२४ रोजी काढलेला आहे. पोलीसांनी ताब्यात घेवून त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे स्थानबदध केले आहे.

