देशी विदेशी दारूची वाहतूक करणारा पकडला !

२ लाख ७४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी —

मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सावर चोळ येथे रानवारा हॉटेल जवळ अजय शांताराम वाकचौरे राहणार निमरळ तालुका अकोले हा खालील प्रमाणे देशी विदेशी दारूची वाहतूक करताना मिळून आला.

त्यास पकडले असून या अवैध दारू वाहतुकीत पोलिसांना खालील प्रमाणे मुद्देमाल मिळाला आहे.

1. 10,500 रुपयाच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या 90 मिलीच्या 300 सीलबंद बाटल्या

2. 40,320 रुपयाच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या 180 मीलीच्या 576 सीलबंद बाटल्या

3. 3600 रुपयाच्या ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीच्या 24 सीलबंद बाटल्या

4.  3840  रुपयाच्या  imperial blue कंपनीच्या 24 सीलबंद वाटल्या

5. 4320 रुपयाच्या रॉयल stag कंपनीच्या  24 सीलबंद बाटल्या

6. 4320 रुपयाच्या रॉयल चॅलेंज कंपनीच्या  24 सीलबंद बाटल्या

7. 3600 रुपयाच्या मॅकडॉल कंपनीच्या 24 सीलबंद बाटल्या

8. 4200 रुपयाच्या ब्लॅक डीलक्स कंपनीच्या बंद बाटल्या

9. 200000 रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट ZDI वाहन क्रमांक MH 48 A 8283

असा ऐकून  2,74,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई संगमनेर तालुका पोलीस स्टेशन कडून झालेली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!