संगमनेर शहरात पुन्हा घरफोडी 

दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचे दागिने लंपास

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील घरफोड्यांचे सत्र थांबलेले नसून पुन्हा एकदा शहरात घरफोडी झाली असून या घरफोडीत चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे.

शहरातील कुरण रोड परिसरात तैबापार्क या ठिकाणी ही चोरी झाली आहे. समरीन साजिद पठाण यांच्या राहत्या घराच्या दरवाजाच्या कडीला लावलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून हॉल आणि बेडरूम मधील लाकडी कपाटाच्या लॉकर मधील सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. या सर्व चोरी झालेल्या मुद्देमालाची रक्कम २ लाख ३५ हजार रुपये २६२ असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

समरिन साजिद पठाण (रा. कुरण रोड, तैबापार्क, संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल या करीत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!