संगमनेर शहरात दोन ठिकाणी घरफोडी ; सोन्या-चांदीचे दागिने चोरले !

प्रतिनिधी —

संगमनेर शहरात होणाऱ्या चोऱ्या आणि घरपोडीचे सत्र पुन्हा चव्हाट्यावर आले आहे शहरात दोन ठिकाणी घरफोडी झाली असून यामध्ये सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

शशांक वाल्मीक झोडगे यांच्या अरगडे मळा येथील निवासस्थानी चोरी झाली असून यामध्ये २६ हजार रुपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. रात्रीच्या वेळी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटा मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले असल्याची फर्याद झोडगे यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे घुलेवाडी येथील रोहित प्रदीप पहलवान यांच्या घरी चोरी झाली असून चोरट्यांनी ६७ हजार दोनशे रुपयांचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. पहलवान यांच्या राहत्या घरी द्वारकामाई कॉलनी, घुलेवाडी रोड, प्रोफेसर कॉलनीच्या मागे असणाऱ्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. रोहित पहलवान यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!